HW News Marathi
राजकारण

पूनम महाजन विलफुल डिफॉल्टर, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

मुंबई | “भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन या सीबीलनुसार हेतुपुरस्सर कसुरदार थकबाकीदार म्हणजेच विलफुल डिफॉल्टर आहेत”, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. “विलफुल डिफॉल्टरच्या यादीत नीरव मोदी, विजय मल्ल्या सारख्या अनेकांबरोबरच पूनम महाजन यांचेही नाव आहे”, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येनुसार, मुदत संपूनही पैसे न देणे किंवा कर्जाचे पैसे दुसरीकडे वळवणे इत्यादी गंभीर बाबींमध्ये विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषीत केले जाते.

“पूनम महाजन आपल्या पतीच्या कंपनीकडे थकबाकी असलेल्या ११.४० कोटी रुपयांच्या कर्जाकरिता जामीनदार म्हणून थकबाकीदार आहेत. परंतु ही बाब त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दडवली आहे. यासंदर्भात बँकेने त्यांच्यावर दावा देखील दाखल केलेला आहे. त्यांचा सीबील स्कोअर हा ६०० असून वैयक्तिक कर्जाचा स्कोअर ५७० आहे. या सीबीलच्या आकडेवारीनुसार, त्यांची पत पूर्णपणे संपुष्टात आली असून त्यांना एक पैशाचेही कर्ज मिळू शकत नाही”, असे सावंत यावेळी म्हणाले.

“महाजन पती पत्नीवर इंडियन ओव्हरसीज बँक व पंजाब नॅशनल बँक यांचे एकूण ६७.६५ कोटी रुपयांच्या वसुलीचे दावे दाखल आहेत. सदर बाब जनतेपासून दडवणे हे अत्यंत गंभीर अशा तऱ्हेचे कृत्य आहे म्हणूनच भाजपासारखा नैतिकेचा बुरखा बाळगणाऱ्या पक्षाला याचे उत्तर देणे गरजेचे आहे”, असे सावंत म्हणाले.

“पूनम महाजन यांची मालमत्ता ही २००९ रोजी १२ कोटी रुपये होती, २०१८ ला १०८ कोटी झाली तर २०१९ रोजी फक्त २ कोटी राहिली आहे. यातूनच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे, हे स्पष्ट होते. बँकांनी यांच्या कर्जाचा किती काही भाग ‘राईटऑफ’केला आहे हेही शोधण्याची आवश्यकता आहे”, असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील! – मुख्यमंत्री

Aprna

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा! – राज ठाकरे

Aprna

आणीबाणीवरुन जेटलींनी साधला माजी पंतप्रधानांवर निशाणा

News Desk