Site icon HW News Marathi

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना BMC निवडणूक एकत्र लढविणार; प्रकाश आंबेडकरांची माहिती

मुंबई | वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आगामी मुंबई महापालिका निवडणुका एकत्र लढविणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi)  प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आज (3 जानेवारी) पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) युती करण्याचा प्रयत्न शिवसेना (Shiv Sena) करत असून याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. तर काँग्रेसचा वंचितसोबतच्या युतीला छुपा विरोध असल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिदेतून केला आहे.

 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बोलणी चालू आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही दोघांनी एकमेकांमध्ये ठरविले आहे की, येत्या बीएमसी निवडणुकीमध्ये एकत्र जाण्याचे कारण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. आम्ही एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या निवडणुका आल्या. तेव्हा ही एकत्र जाण्याचे निर्णय शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची बोलणी करणाऱ्यांमध्ये हा निर्णय झाला आहे, अशी सध्या परिस्थिती आहे.”

 

वंचितसोबतच्या युतीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा वंचितसंंदर्भातील युतीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ” यात शिवसेनेचा हा प्रयत्न आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही आपण बरोबर घेतले पाहिजे. आम्ही त्यांना म्हटले की, आमचा विरोध नाही. सूत्रांकडून आम्हाला असे कळाले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध आहे. याला काँग्रेसचाही छुपा विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उघडपणे विरोध आहे. आणि त्यांना गरीब मराठा सत्तेमध्ये यावा, यांच्याबद्दल त्यांच्या अपेक्षा आणि विरोध आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला त्यांचा विरोध आहे. असे असले तरी आमचा आणि शिवसेनेचा निर्णय झाला, तो फक्त आम्हाला जाहीर करायचा आहे.”

 

 

 

 

Exit mobile version