Site icon HW News Marathi

शिंदे गट दादरमध्ये नवे सेना भवन उभारणार; सदा सरवणकरांची माहिती

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली. यानंतर शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. पक्षापासून वेगळी भूमिका घेतल्याच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला होता. यात पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाने पुन्हा एकदा मुंबईत नवे सेना भवन (New Sena Bhavan) उभारणार असून यासाठी शिंदे गटाचे नवे सेने भवन दादरमध्येच उभारणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी केले आहे.

दरम्यान, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईतील दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: कार्यालयात येऊन जनतेच्या समस्या सोडवणार आहेत. येत्या 15 दिवसांमध्ये कार्यालयात उद्घटान होणार आहे. या कार्यालयासाठी जागा निश्चित झाली असून या कार्यालयातून नागरिकांच्या समस्या समजून त्यासोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सरवणकर यांनी दिली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेले शिवसेना भवन देखील दादरमध्येच आहे. तर आता शिंदे गाटने देखील  त्यांचे मुख्य कार्यालय दादरमध्येच उभारण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Exit mobile version