Site icon HW News Marathi

“…जणू काही खेडला दसरा मेळाव्याची जाहीर सभाच”, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | “उद्धव ठाकरे येणार म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, रायगड, सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून सर्व लोक आणण्याची प्रचंड तयारी चालू आहे. जणू काही खेडला दसरा मेळाव्याची जाहीर सभाच आहे”, असा टोला शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी लगावला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (५ मार्च) खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर निशाणा साधला. रामदास कदमांच्या टीकेला उद्धव ठाकरे आजच्या सभेतून काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेकडे तुम्ही कसे बघा, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर रामदास कमद म्हणाले, “खेड हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला होता. आज ही आहे आणि उद्याही असेल. या काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे येणार म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, रायगड, सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून सर्व लोक आणण्याची प्रचंड तयारी चालू आहे. जणू काही खेडला दसऱ्याची जाहीर सभाच आहे. रामदास कदमचा किती मोठा धसका घेतला गेलाय, हे यावरून स्पष्ट होत आहे. बाहेरची लोक आणून इथे राजकारण होत नसते ना. ते येतील भाषण करतील ऐकतील आणि निघून जातील. इथले स्थानिक किती आहेत. २-४ टक्के तरी स्थानिक आहेत का?, नाहीत. त्यामुळे मला त्याची काळजी नाही. याव बोलवे, जावे आम्ही त्याची नोंद पण घेत नाही. पण, या सगळ्याला उत्तर, याच ठिकाणी, त्याच मैदानामध्ये १९ मार्चला मी सभा घेतोय, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील आहेत. शभूराज देसाई आहेत, महाडचे आमदार गोगावले आहेत. आणि त्याच ठिकाणी व्याजासह त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील”, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर टीका केली.

पर्यावरण खात्याला बजेट नव्हते

पर्यावरण खात्यातून जो काही पैसा आला त्यातून योगेश कदम आमदार झालेत, असा गंभीर आरोप संजय कदम यांनी केला, या प्रश्नवर रामदास कदम म्हणाले, “मला वाटते, त्याचा अभ्यास अजिबात नाही. त्यांची ओळख ही गावढी आमदार म्हणून आहे. विधीमंडळात पाच वर्षात किती वेळा बोलले. त्यांची माहिती काढून घ्या, मग तुम्हाला कळेल. मुळात पर्यावरण खात्याला बजेट नव्हते. आणि ज्या खात्याला बजेटच नव्हते. हे खाते कधीच नव्हते. पर्यावरण खाते हे वेगळे कधीच नव्हते. मला काही तरी द्याला पाहिजे, म्हणून उद्धवजींनी मला ते खाते देऊन बसविले होते. त्याला शून्य बजेट होते. अनेक ठिकाणी जे ब्रिटशकालीन तलाव होते. ते शुशोभीकरणासाठी मी मुनंगटीवार आणि देवेंद्रजींना सांगून निधी घेतला आणि तलावाची कामे केली. बाप दाखवा नाही तर श्रद्ध घाला, या त्यांच्या विधानावर मी न्यायालयात जाईन. आणि मी मानहानीचा दावा त्यांच्यावर करणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमला विकासासाठी ५० कोटी रुपये दिले

आगामी निवडणुकीत आम्ही लढणार आणि रामदास कदमांचा पराभव करा, यावर रामदास कदम म्हणाले, “आगामी निवडणुकीत लढणार आणि ५० हजार मतांनी पडणार, हे लिहून ठेवा. रामदास कदम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेले आहे. अख्या महाराष्ट्राच्या लढाया मी लढलोय. माझ्या मुलाला कसे निवडणून आणायचे हे मला माहिती आहे ना. आणि इथे त्यांची कामे चालू आहेत. आज जवळजवळ ५०कोटी, ५० खोके त्यांच्या भाषेत योगेश कदमला मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी दिलेले आहे. जेव्हा लोकांना विकास कामे मिळतात. तेव्हा लोक पाठिशी राहतील ना. लोकांना अजून काय हवे आहे. हे खोके…खोके… म्हणतात ना.  उद्धवजींनी अडीच वर्षात किती दिली ते सांगा. ते कोणत्या आमदारांना भेटत नव्हते. तर निधी तर लांबच राहिला. अजित पवारांनी त्यांच्या पक्षाचे काम केले. निवडणुकीची आम्हाला अजिबात काळजी नाही. कालच्या निवडणुकीमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेसची जागा होती. ती खेचून आम्ही भगवा फडकविला आहे. पण, मला असे वाटते उद्धव साहेबांसारखा पहिला नेता असेल  आपल्या पक्षाच्या आमदाराला आपणच संपवायचे. आणि दुसऱ्यांचे भाड्याने विकत घ्याचे. हे शिवसेनाप्रमुखांनी कधी केले नव्हते.

 

 

 

Exit mobile version