June 26, 2019
HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पराभवाची चर्चा करण्यापेक्षा विधानसभेची तयारी करा !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, राष्ट्रवादी पक्ष मजबूत ठेवायचा असून विचारधारेशी तडजोड न करता पक्षाचे अस्तित्व स्वतंत्र ठेऊन पुढे काम करायचे असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्यापेक्षा विधानसभेची तयारी करा, असा सल्ला देखील पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.  पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबंधित करताना म्हणाले.

आज संपूर्ण देशात ज्या विचारधारेला आपण सातत्याने विरोध केला. त्या विचारधारेचे सरकार आले आहे. गांधी, नेहरु, आंबेडकर, शाहू यांनी व्यापक समाजाचा विचार लोकांमध्ये मांडला. या विचारधारेने पक्ष मजबूत ठेवायचा आहे, असे शरद पवारांनी सांगितले. यावेळी पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवादी जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडले. त्यामुळे देशात असा निकाल लागला. विधानसभा निवडणूक वेगळी असते. महाराष्ट्रात भाजपकडे चेहरा नाही. महाराष्ट्रात पर्याय कोण देवू शकतो असा लोकांना प्रश्न आहे. त्यामुळे आपण लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय द्यायचा. त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

पक्ष स्थापनेनंतरच्या आठवणी

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. यानंतर १४ वर्षे राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेमध्ये होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी अनेक विकास कामे केली. विकास कामाचे दाखले दिले असून राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडे जावे असे लोकांमध्ये चर्चा व्हायची असे, सांगून पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्यापेक्षा विधानसभेची तयारी करा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. 

Related posts

#Results2018 : पाचही राज्यांमध्ये विधानसभांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

News Desk

मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

आम्हाला आघाडीत घेण्याचा प्रयत्न हा केवळ त्यांचा दिखावा !

News Desk