HW News Marathi
राजकारण

राष्ट्रपती निवडणूक २०२२; निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना

मुंबई । भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत काल सेंट्रल हॉल, विधान भवन, मुंबई येथे राष्ट्रपती पदाकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सीलबंद मतपेटी आणि इतर निवडणूक साहित्य नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, उप सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी सदर निवडणूक मतपेटी आणि इतर सीलबंद साहित्य छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाद्वारे राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे नेण्यासाठी प्रयाण केले.
राष्ट्रपतीपदासाठीची या निवडणुकीत एकूण २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला असून 5 सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावू शकले नाही. दिवसभर चाललेली ही मतदान प्रक्रिया शांतपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

Related posts

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर निवासात तातडीची बैठक

News Desk

मुख्यमंत्री फडणवीस स्वर्गीय वसंतराव नाईक यांचाही रेकॉर्ड तोडतील !

News Desk

शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप

News Desk