HW Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी हर्षिल सीमेवर जवानांसोबत साजरी केली दिवाळी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षीप्रमाणे यंदाची ही दिवाळी भारतीय जवानांनसोबत साजरी केली आहे. उत्तराखंडमधील हर्षिल येथील जवानांच्या कॅम्पमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी जवानांची भेट घेतली आहे. पंतप्रधान पदावर आल्यापासून नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली.

यंदा मोदींनी उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठाई खाऊ घातली आहे.’तुमच्यामुळे देशाचे नागरिक शांतपणे झोपू शकतात’, अशी भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.

जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर नरेंद्र मोदी केदारनाथला गेले होते. मोदींनी बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरात पूजा अर्चना केली. त्यानंतर उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विकासकामांची पाहणी सुद्धा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे. यावेळी मोदींसोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि अन्य सैन्याचे अधिकारी देखील हजर होते.

Related posts

राहुल यांची भेट म्हणजे राजकीय खेळी, पर्रीकरांनी सुनावले

News Desk

सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली !

News Desk

कोकणातून नाणारचा राक्षस घालवल्याबद्दल उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

News Desk