HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी आपला शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा !

नवी दिल्ली | वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींनी आपला शाळा सोडल्याचा दाखला प्रसिद्ध करावा”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. माढा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी आपण ओबीसी असल्याचे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर पुरावा म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला प्रसिद्ध करावा अशी मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांमध्ये घेतल्या जवळपास प्रत्येक सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. शरद पवार नौ दो ग्यारह झाले आहेत, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी माढ्याच्या प्रचारसभेत केली होती. मी मागासवर्गीय आहे म्हणूनच काँग्रेसने मला जातीवाचक शिव्या दिल्या. “शरद पवार हे स्वत:वर किंवा त्यांच्या कुटुंबावर पराभवाचे खापर फुटू देत नाहीत. आजची ही विराट सभा पाहून शरद पवार यांनी मैदान का सोडले ते मला कळाले”, असेही मोदी यावेळी म्हणाले होते. काँग्रेस मागासवर्गीयांना चोर म्हणते ते मी सहन करणार नाही, असेही पंतप्रधान मोदींनी या सभेत म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#ElectionsResultsWithHW : आमची आघाडी जनतेच्या पसंतीस उतरली नाही !

News Desk

महाराष्ट्रातील सत्तांतरावर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी; आजचा युक्तीवाद पूर्ण

Aprna

इंजिनीअरिंगच्या निम्म्या वर्गांना कुलूप लागण्याला जबाबदार कोण ? – उद्धव ठाकरे

News Desk