HW News Marathi
राजकारण

संपूर्ण देशाला वेदना होत असताना ‘प्राइम टाईम मिनिस्टर’ शूटिंगमध्ये व्यस्त होते !

नवी दिल्ली | “पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही “प्राइम टाईम मिनिस्टर” तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते”, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) केली आहे. “पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत असताना, शहीद जवानांच्या घरातील स्थिती दुःखद असताना पंतप्रधान मोदी मात्र पाण्यामध्ये हसत शूटींग करीत होते”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. सध्या सोशल मीडियावर #PhotoShootSarkar हा हॅशटॅग चालत आहे.

“संपूर्ण देश पुलवामा भीषण हल्ल्याच्या दुःखात बुडालेला असूनही पंतप्रधान मोदी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत शुटींगमध्ये व्यस्त होते. जगातील कोणता पंतप्रधान असा वागतो ? पुलवामामध्ये दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी हल्ला झाला. मात्र, पंतप्रधान मोदी ६ वाजून १० मिनिटापर्यंत शुटींग करण्यात, स्वतःच्या नावाच्या जयघोषात व्यस्त होते”, असा गंभीर आरोप याआधी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात मोदींची त्सुनामी, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला अभूतपूर्व विजय मिळेल !

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…नंदुरबार मतदारसंघाबाबत

News Desk

#LokSabhaElections2019 : मला फक्त समुद्राची लाट माहित आहे !

News Desk