HW News Marathi
राजकारण

देशाच्या पंतप्रधान फोटो कचरा कुंडीवर ही परिस्थिती भाजपने लावला! – उद्धव ठाकरे

मुंबई। ‘देशाच्या पंतप्रधान फोटो कचरा कुंडीवर ही परिस्थिती भाजपच्या प्रवक्तांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमान केल्यामुळे आणली,’असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (८ जून) औरंगाबादच्या संस्कृती मंडाच्या मैदान पार पडली. नुकतेच जगभरात भारतावर भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मावर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाण साधला आहे.  या सभेतून मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे नामांतर, औरंगाबादचा पाणी प्रश्न, काश्मीर पंडित आदी मुद्द्यांवर भाजप आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, “भाजप नेत्याने प्रेषीतांचा अपमान काय केला. काय संबंध यांचा तुमचा आपण म्हणतो की, आपल्या देवीदेवतांचा अपमान करायचा नाही,असे आपण म्हणतो. तसेच कोणाच्या देवांचा अपमान करायची तुम्हाला गरज नाही. या अपमानामुळे अरब देश एकत्र आले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावर आणले. त्या सर्वांनी आपल्या देशाला माफी मागायला लावली. आणि देशाच्या पंतप्रधान फोटो कचरा कुंडीवर ही परिस्थिती भाजपने लावला.”
मी माझ्या वडिलांना दिलेले वचन विसलेलो नाही
 उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपची सत्ता होती,  तेव्हा सुचत नव्हते. सत्ता गेल्यावर एकदम अंगात येते की, औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर कधी करणार?,  आता हे आपल्याला यांनी सांगायचे?,  औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचे वचन माझ्या वडिलांनी शिवसेना प्रमुख हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे. मी ते वचन विसलेलो नाही, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. “

Related posts

तुम्हाला लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका !

News Desk

दिवंगत हेगडेवारांवर माजी राष्ट्रपतींची स्तुती सुमन

News Desk

नितीश कुमार भाजपची साथ सोडणार ?

News Desk