HW News Marathi
राजकारण

प्रियांका गांधींनी लावला बैठकांचा सपाटा

नवी दिल्ली | पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आलेल्या प्रियांका गांधी या आता राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (१२ फेब्रुवारी) एका मागोमाग एक बैठकांचा धडाका लावला. मंगळवारी दुपारी साधारण १.३० वाजल्यापासून बुधवारी (१३ फेब्रुवारी) पहाटे ५.१५ पर्यंत प्रियांका गांधींच्या बैठका सुरु होत्या. यावेळी प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेत्यांना विचारलेल्या प्रश्नांमुळे नेत्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

प्रियांका गांधी यांनी घेतलेल्या या बैठकांदरम्यान ‘प्रियांका यांनी फूलपूर येथून निवडणूक लढवावी’ अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. ”मी निवडणूक लढवावी यासाठी अनेक ठिकाणाहून आग्रह होत आहे. मात्र मी निवडणूक लढणार नाही. मी संघटना भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांकडून प्रियंका गांधींकडे विविध तक्रारी देखील करण्यात आल्या. “सामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न असेल”, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Aurngabad : मृत मजूरांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत – शिवराज सिंह

News Desk

बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही !

News Desk

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे; निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

Aprna