HW News Marathi
राजकारण

प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाने भाजप घाबरले !

नवी दिल्ली | प्रियांका गांधी पुन्हा राजकारणात आल्याने भाजप घाबरले आहे. मी खूप आनंदी आहे. कारण, प्रियांका आता माझ्यासोबत काम करणार आहे. आम्हाला उत्तर प्रदेशसाठी तरुण नेतृत्वाची गरज होती. प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे शक्तिशाली नेते आहेत, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेसकडून आज (२३ जानेवारी) प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रियांका गांधी यांना याआधी काँग्रेसकडून कोणतेही पद देण्यात आले नव्हते. मात्र, आता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधींकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आव्हान देण्यासाठी प्रियांका गांधींची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासंचालकपदी निवड करण्यात आल्याची चर्चा होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केवळ नरेंद्र मोदीच एक मजबूत सरकार देऊ शकतात !

News Desk

लोकशाही दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन

News Desk

संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन

News Desk