HW News Marathi
राजकारण

“आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून…,” राज ठाकरेंनी पत्रद्वारे देवेंद्र फडणवीसांचे केले कौतुक

मुंबई | “आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. तुमच्या कृतीतून दाखवून दिले,” या शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत पत्र लिहून कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

याआधी फडणवीसांनी पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पदी सांभाळले. आताचे शिंदे सरकार आणण्यासाठी अपार कष्ट केले. परंतु, या सरकारमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पदी नाही तर पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार उपमुख्यमंत्री पद सांभाळणार आहेत. फडणवीसांच्या या कृतीचे राज ठाकरेंनी कौतुक करत अभिनंद केले आहे.

राज ठाकरेंनी पत्रात नेमके काय म्हणाले
श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !
प्रिय देवेंद्रजी,
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…
तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!
आता जरा आपल्यासाठी
ही बढ़ती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.
एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!
आपला मित्र
राज ठाकरे
संबंधित बातम्या
शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

News Desk

जनतेनेच भाजपला रामनाम सत्य केलेय । नवाब मलिक

News Desk

केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

News Desk