HW News Marathi
राजकारण

मुलायमसिंह यांचे आता वय झाले आहे !

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो”, असे अत्यंत मोठे वक्तव्य समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यांनी बुधवारी (१४ फेब्रुवारी) लोकसभेत केले. यावरून बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीही मुलायम सिंह यादव यांची खिल्ली उडविली आहे. “मुलायमसिंह यांचे आता वय झाले आहे. कधी काय बोलायचे हे त्‍यांच्‍या लक्षात राहत नाही. त्यांच्या या बोलण्याला काही अर्थ नाही”, असे म्हणत राबडी देवी यांनी मुलायमसिंह यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

मुलायमसिंह यांचे हे वक्तव्य आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचमुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र, राबडी देवी यांनी मुलायमसिंह यांची खिल्ली उडविली. सपक्ष आणि बसप मोदी सरकारच्या विरोधात सज्ज झालेले असताना समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधान मोदींचे केलेले कौतुक निश्चितच लक्ष वेधणारे आहे.

“नरेंद्र मोदी हे कायमच चांगले काम करीत आले आहेत. त्यांनी कायम माझी मदत केली आहे. भाजपचे सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि मोदी तुम्ही पुन्हा पंतप्रधान व्हा”, असे मुलायम सिंह यावेळी म्हणाले. मुलायमसिंह यांच्या या वक्तव्यानंतर यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांना देखील आपले हसू अनावर झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये !

News Desk

योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी | अशोक चव्हाण

News Desk

मुख्यमंत्री फडणवीस स्वर्गीय वसंतराव नाईक यांचाही रेकॉर्ड तोडतील !

News Desk