HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

कॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले !

मुंबई | “कॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहण्याआधी विधानसभेपर्यंत आपल्या पक्षातील आमदार सांभाळावेत”, असा टोला नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नुकतीच शनिवारी (१३ जुलै) बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना “पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचे सरकार येईल”, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. बाळासाहेब थोरात यांच्या या विधानांवरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा टोला लगावला आहे. “कॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले आहे. मात्र, यामुळे काहीही साध्य होणार नाही. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आघाडीचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहण्याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी किती आमदार त्यांच्या पक्षात राहतील याची काळजी घेणे बरे”, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Related posts

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk

राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ नव्या १३ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

News Desk

#MarathaReservation : काँग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने हातळला !

News Desk