HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

नवी दिल्ली | देशातील सर्वच राजकीय पक्ष आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप-काँग्रेस यांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु आहे. दरम्यान, सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या रॅलीमध्ये देशातील रोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपला अडचणीत टाकण्याच्या प्रयत्नात आहेत.

विशेष म्हणजे देशातील रोजगार संधी आणि कृषी विकास या दोन मुद्द्यांसंदर्भात काँग्रेस एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक तज्ज्ञांची मदत घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस याच दोन मुद्दे आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी एक कमिटी तयार केली असून या कमिटीची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर सोपवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमची ५ वर्षे विरोधकांची रखडलेली काम करण्यातच गेली !

News Desk

ममतांनीच आत्महत्येस प्रवृत्त केले, आयपीएस अधिकाऱ्याच्या सुसाईड नोटमुळे ममता अडचणीत

News Desk

मराठा आरक्षणाच्या मर्यादेत वाढ केल्याशिवाय हे आरक्षण टिकणार नाही !

News Desk