HW Marathi
देश / विदेश राजकारण

लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेस नेते आणि वायनाड मतदारसंघाचे राहुल गांधी यांनी गुरुवारी (११ जुलै) लोकसभेत भाषण केले. केरळमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर गेल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने मोठ्या व्यावसायिकांचे तब्बल ५.५ लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याचे सांगत काँग्रेस नेते आणि वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांनी आत्महत्या आणि कर्जमाफी यांसारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.

देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट असताना यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही पावले उचलण्यात आली नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. वायनाड येथे तब्बल ८ हजार शेतकऱ्यांना कर्ज न फेडल्याचे सांगत बँकेकडून पाठविण्यात आलेल्या अनेक शेतकऱ्यांना नोटीसही पाठविण्यात आल्या आहेत तसेच अनेकांच्या जमिनी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. परिणामी येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Related posts

…तर जनताच बंड करील | उद्धव ठाकरे

News Desk

#ConstitutionDay : जाणून घ्या… का साजरा केला जातो संविधान दिवस

News Desk

जातीयवाद वाढविण्यात मुख्यमंत्र्यांना यश

News Desk