Site icon HW News Marathi

‘भाईयो और बहनो’, म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधानांची नक्कल

मुंबई | काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्य प्रदेशमध्ये ‘भारत जोडो यात्रे’च्या (Bharat Jodo Yatra) निमित्ताने जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधींचा हा व्हिडिओ भारत जोडो यात्रेतील सभेमधील आहे. सध्या भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये दाखल झालेली आहे. ही यात्रा बुधवारी (23 नोव्हेंबर) रोजी रात्री बुरहानपूर येथील राहुल गांधींची सभा होती. या सभेदरम्यान राहुल गांधींनी उपस्थिताना संबोधित करताना  ‘भाईयो और बहनो’ असे म्हणत त्यांनी पंततप्रधानांची नक्कल केली.

या सभेदरम्यान राहुल गांधी भाषण सुरू असताना लोकांनी ‘राहुल गांधी जिंदाबादचा नारा’चा नारा दिला. यावेळी राहुल गांधी पंतप्रधानांची नक्कल करत ‘भाईयो और बहनो’ म्हणतात यावेळी सभेत उपस्थितांमध्ये हशा पिकला. यानंतर राहुल गांधीनी पंतप्रधानांची नक्कल केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

काय म्हणाले राहुल गांधी?

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी भाषण करताना मोदींची नक्कल करत ‘भाइयो और बहनो’ दिसत आहेत. केवळ एकदा नवे तर त्यांनी २-३ वेळा ‘भाइयो और बहनो’ आणि मित्रो म्हणत जनतेला संबोधित केले आहे. राहुल गांधी म्हणतात, “कमलनाथ यांनी मला आता विचारला राहुल तुम्ही थकत नाही?, यावर राहुल गांधींनी सभेला उपस्थित जनतेला मोदींची नक्कल करत ‘भाइयो और बहनो’ म्हणत प्रश्न विचारला की माझा चेहरा पाहून तुम्हाला मी थकलेला दिसतो का? मी आतापर्यंत दोन हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे आणि अजून मी थकलेलो नाही, एक सेकंद देखील मी थकलेलो नाही. मी सकाळी ६ वाजता उठून चालायला सुरुवात करतो आणि सकाळी ६ वाजतापेक्षा रात्री ८ वाजता मी दुप्पट गतीने चालतो, असे ते म्हणाले.

 

Exit mobile version