नवी दिल्ली | “राहुल गांधींकडे सध्या ‘मोदी हटाओ’ व्यतिरिक्त कोणताही कार्यक्रम नाही. राहुल गांधी भाजप नेत्यांपेक्षाही जास्त वेळा नरेंद्र मोदींचे नाव घेतात. राहुल गांधी काँग्रेससाठी प्रचार करतात कि भाजपसाठी ते आम्हाला कळत नाही “, असा टोला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला आहे. “राहुल बाबा मोठमोठ्याने बोलत होते की मध्य प्रदेश आणि राजस्थानामध्ये काँग्रेसचे सरकार येईल. परंतु राहुल बाबा एक लक्षात घ्या कि, स्वप्न पाहणे चांगले असते मात्र दिवास्वप्न पाहणे नाही”, असेही अमित शहा यावेळी म्हणाले.
BJP President Amit Shah in Sawai Madhopur: Rahul Gandhi is taking the name of Modi ji more than we in BJP take, we don't understand if he is campaigning for Congress or for the BJP #RajasthanElections2018 pic.twitter.com/jeBpn6qncC
— ANI (@ANI) December 3, 2018
Amit Shah in Pratapgarh, Rajasthan: Duniya mein 5 chize hoti hain-antariksh,akash,bhumi,samundra&pataal. Congress ne antariksh mein ISRO aur 2G ka ghotala kiya,akash mein Westland Helicopters ka,bhumi par Adarsh Society ka,dariya mein submarine ka aur pataal se koyla bhi le gaye pic.twitter.com/FELt0cyOVU
— ANI (@ANI) December 3, 2018
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी अमित शाह यांनी काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जोरदार टीका केली आहे. ते प्रतापगढमध्ये बोलत होते. त्याचप्रमाणे, काँग्रेसने पंचमहाभूतांवर घोटाळे केले आहेत, अशी बोचरी टीका शहा यांनी केली आहे. ‘काँग्रेसने अंतराळात इस्रो आणि 2जी घोटाळा, आकाशात वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, जमिनीवर आदर्श सोसायटी घोटाळा तर समुद्रात पाणबुड्या आणि पाताळात कोळसा घोटाळा केला”, अशीही टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.