HW Marathi
देश / विदेश राजकारण

राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम

नवी दिल्ली | यूपीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज (२६ जून) काँग्रेसच्या खासदारांची बैठक पार परडली. यात राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. या बैठकीत पक्षाच्या ५१ खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. काँग्रेसच्या सर्व ५१ खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. परंतु राहुल यांनी अध्यक्षपदावर राहण्यास नकार दिला आहे.

काँग्रेस खासदार शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी राहुल गांधी यांना पदावर कायम राहण्याबाबत विनंती केली. राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी मागणी खासदारांनी केली. लोकसभा निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचे काँग्रेस खासदार शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी म्हटले.

Related posts

इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

News Desk

#LokSabhaElections2019 : गोवा काँग्रेसकडून राज्यात सत्ता स्थापनेचा दावा

News Desk

महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय?

News Desk