HW Marathi
देश / विदेश राजकारण

पराभवानंतर राहुल गांधींनी अमेठीला दिली पहिल्यांदा भेट

अमेठी | लोकसभा निवडणुकीत अमेठी या परंपरागत मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यानंतर आज (१० जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदा भेट दिली आहे. यापूर्वी अमेठीमधून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु यंदा मात्र भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुलचा पराभव केला होता. तर राहुल यांनी केरळच्या वायनाडमधून विजय मिळाला आहे.  राहुल यांनी भेटीदरम्यान सलोन, अमेठी, गौरीगंज, जगदीशपुर तसेच तिलोई विधानसभा क्षेत्रातील बुथ अध्यक्षांसह पक्षाच्या प्रतिनिधींना भेटून त्‍यांच्याशी चर्चा करणार आहेत. या सोबतच अनेक गावांचा दौराही राहुल करू शकतात, अशी माहिती मिळाली आहे.

राहुल गांधी यांनी पहिल्‍यांदा अमेठीमधून २००४ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्‍यांनी विजय संपादन केला होता. यानंतर २००९ तसेच २०१४ मध्येही याच मतदारसंघातून खासदार म्‍हणून विजयी झाले होते. त्‍याचबरोबर अमेठी काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो. या पराभवानंतर काँग्रेसकडून या पराभवाची समीक्षा करण्यासाठी राहुल अमेठीत गेल्याचे म्हटले जाते.

तसेच  स्‍मृती ईराणी यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्‍यानंतर तीन वेळा अमेठीचा दौरा केला आहे. पहिल्‍यांदा त्‍यांनी २६ मे रोजी अमेठीला आल्‍या. कारण पक्षाचे नेते सुरेंद्र सिंह यांची हत्‍या झाली. यावेळी ईराणी सुरेंद्र सिंह यांच्या अंत्‍ययात्रेत सहभागी झाल्‍या होत्‍या. २२ जूनला त्‍या अमेठीमध्ये आल्‍या. यावेळी त्‍यांनी एका आजारी महिलेला आपल्‍या गाडीतून रूग्‍णालयात दाखल केले. यानंतर त्‍या ६ जूलै रोजी अमेठीमध्ये आल्‍या होत्‍या.

 

Related posts

…नाहीतर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा !

Gauri Tilekar

लोकसभेनंतर काँग्रेस पक्ष मोठ्या आर्थिक संकटात ? 

News Desk

दिल्लीची लोकसंख्या २०३५ सालापर्यंत ४.५ करोड होणार

News Desk