HW News Marathi
राजकारण

२०१९ मध्ये बॉल स्विंग होणार नाय; राज ठाकरे यांची मोदी-शहा जोडीवर टीका

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदीमुक्त भारत करण्याची घोषणा केल्यानंतर आता आपल्या नव्या व्यंगचित्रांतून या मोदी-शाह जोड गोळीवर चांगलाच स्विंग टाकला आहे.

ऑस्ट्रेलियन त्रिकुटाने चेंडूशी छेडछाड केल्याचं प्रकरण गाजत असताना, त्याचाच संदर्भ घेऊन राज ठाकरेयांनी मोदी-शहांमधील ‘दिल्लीच्या ड्रेसिंग रूममधील चर्चे’ची खिल्ली उडवली आहे.

गेल्या काही काळापासून राज ठाकरे सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य करत आहेत. आपल्या फेसबुक पेजवरील निम्म्याहून जास्त व्यंगचित्रांतून त्यांनी मोदी-शहांचा समाचार घेतलाय. तीच मालिका कायम ठेवत आज त्यांनी खास ‘ठाकरी’ रिव्हर्स स्विंग टाकलाय.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शाह यांना 2014 मधील जुमल्यांचा बॉल 2019 मध्ये स्विंग होणार नाही,असे सांगत आहेत. तर शाह 2014 मधील जुमल्यांचा बॉल निरखून पाहत आहेत.बॉल टेम्परिंग प्रकरणाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे.

मोदीमुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं सूचक आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यामुळे येत्या काळात मोदी-शहा हेच राज ठाकरेंचं टार्गेट असणार, हे नक्की आहे.

https://www.facebook.com/RajThackeray/photos/a.165383467326144.1073741826.165370377327453/320384368492719/?type=3

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार असेल तर आमचा नक्कीच पाठिंबा असेल !

News Desk

“OBC आरक्षणासंदर्भात आम्हाला क्रेडिट नको…,” एकनाथ शिंदेंचा ‘मविआ’ला टोला

Aprna

बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट! –  नाना पटोले

Aprna