HW News Marathi
राजकारण

राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे विवाहबंधनात अडकले

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज (२७ जानेवारी) विवाहबंधनात अडकले. या विवाह सोहळ्यासाठी अनेक राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट, आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहिले होते. हा विवाह लोअर परळ येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये दुपारी १२ वाजून ५१ वाजता पार पडला.

अमित आणि मिताली यांचा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा पार पडला होता. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मितालीने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसह कुटुंब या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते. तसेच नवदांपत्यांना आशिर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , नितीन गडकरी , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, रतन टाटा, बाबासाहेब पुरंदरे, जयदेव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेता अमिर खान, साजिद खान, भाजप नेते अशिष शेलार, शायना एन.सी., आमदार प्रणिती शिंदे, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रातोरात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन

News Desk

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही! – उद्धव ठाकरे

Aprna

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही !

News Desk