Site icon HW News Marathi

राजन साळवींच्या कुटुंबियांना ACB ची नोटीस; “तिकडे जाणारे सर्व नेते…”

मुंबई | ठाकरे गटाचे नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या कुटुंबियांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीची नोटीस बजावली आहे. एसीबीने राजन साळवी, त्यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस बजावली आहे. राजन साळवींच्या कुटुंबियांना 20 मार्च रोजी चौकशीसाठी एसीबीने बोलवण्यात आले आहे. यापूर्वी राजन साळवींना एसीबीने तीन वेळा चौकशीसाठी बोलविले होते.

या प्रकरणी विधानभवनात माध्यमांशी बोलताना राजन साळवी म्हणाले, “आज सकाळी माझी पत्नी, भाऊ आणि त्यांची पत्नीला सुधा एसीबीची नोटीस आली आहे. 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता चौकशी बोलावण्यात आले आहेत. एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिक आमदार झाल्यामुळे त्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे.”

“जे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांनाच नोटीस पाठविल्या जात आहेत. तर भाजप किंवा शिंद गटाला नोटीस येत नाही. तिकडे जाणारे सर्व नेते वॉशिक मशीनमधून स्वच्छ होतात. आणि आम्हीलाच फक्त दोषी ठरविले जाते. याचा आम्ही निषेध करतोय. तर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला आहे.”

 

 

Exit mobile version