Site icon HW News Marathi

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार राजन साळवींची साडे चार तास चौकशी

मुंबई |  शिवसेनेचे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) चौकशी केली आहे. राजन साळवींना आज लाचलुचपत विभागाने चौकशी केली होती. साळवींना 5 डिसेंबर रोजी चौकशी होणार होती. परंतु, साळवींनी लाचलुचत विभागाकडे वेळ मागून घेतला होता. यानंतर साळवी आज (14 डिसेंबर) रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागात साडे चार तास चौकशी केली होती.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यलायबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांनी साळवींच्या नावाच्या जोरदार घोषणा देखील दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यकालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यालयाच्या परिसरात जमाव बंदी लागू करण्यात आली होती.

“मी घाबरणार नाही, मी माझे काम करत राहीन. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकविले आहे. यामुळे या नोटीसींचा मला फार फरक पडणार नाही. मी सर्व चौकशीला ठाम पणे सामोरे जाईन. या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही”, असा विश्वाच साळवींनी चौकशीनंतर व्यक्त केला आहे.

 

 

Exit mobile version