HW News Marathi
राजकारण

रामदास आठवले हे प्रामाणिक कार्यकर्ते | राजा ढाले

मुंबई | रामदास आठवलेंना माझे दुःख कळते. पण समाजात ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत त्यांना आमचे दुःख कळत नाही. तथागत बुद्धांनी वैराला अवैराने जिंकण्याचे मित्रत्वाने जिंकण्याचे तत्व सांगितले आहे.त्यामुळे माझा आठवलेंवर राग नाही. ते माझे मित्र आहेत. ते चांगले प्रामाणिक कार्यकर्ते असे सांगत समाजातील श्रीमंतांना आंबेडकरी चळवळीला मदत करा, दानशूर व्हा असे आवाहन आंबेडकरी चळवळी चे ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी रवींद्र नाट्यमंदिर येथे सत्काराला उत्तर देताना केले.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी चळवळी चे अग्रणी भाष्यकार म्हणून राजा ढाले यांचा त्यांच्या 78 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केलेला होता. त्यावेळी राजा ढाले यांचा ना रामदास आठवले यांच्या हस्ते 10 लाख रुपये गौरवनिधी आणि पँथर चे सन्मानचिन्ह ; शाल ;फेटा ; गौरवपत्र प्रदान करून शानदार सत्कार करण्यात आला. यावेळी सीमा आठवले; जित आठवले ;राजा ढाले यांची कन्या गाथा ढाले; बहीण मालनताई कांबळे उपस्थित होते. या ऐतिहासिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ इंदिरा आठवले; आशालता कांबळे;प्राचार्य बापूसाहेब माने; सुधाकर गायकवाड; या मान्यवर वक्त्यांसोबत अविनाश महातेकर; गौतम सोनवणे;सुरेश बारशिंग; अभयाताई सोनवणे; संदेश उमप ; संगीतकार प्रभाकर धाकडे ;सिद्धार्थ कासारे;हेमंत रणपिसे; रमेश गायकवाड; सचिनभाई मोहिते; चंद्रशेखर कांबळे प्रवीण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रवींद्र नाट्यमंदिरात आंबेडकरी जनतेने गुरुशिष्यांच्या भेटीचा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त प्रकाश आंबेडकरांचे आहेत का असा सवाल यावेळी राजा ढाले यांनी सभागृहाला विचारला. त्यावेळी संपूर्ण सभागृहाने नाही असे उत्तर देत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे असल्याचे म्हंटले. त्यामुळे कोणी कोणत्याही पक्षात असो. आठवलेंची युती कोणासोबत ही असो मी सर्व समाजाच्या व्यापक एकजुटीसाठी तुमच्या सोबत आहे असे राजा ढाले यावेळी म्हणाले. भारतातील दलितांचे कसले शोषण होते हे मार्क्सवाद्यांना माहीत नाही.मार्क्सवाद केवळ आर्थिक गुलामगिरी विरुद्ध असून जातीव्यवस्थेविरुद्ध नाही.केवळ आर्थिक समता म्हणजे समता नाही. भारतात लोकशाही आणि जातीभेद एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे विषमता मिटविल्याशिवाय लोकशाही; बंधुत्व; लोकशाही टिकू शकत नाही.समतेसाठी लढा हाच राष्ट्र घडविण्याचा लढा आहे असे सांगत आपली आंबेडकरी चळवळ आदिवासींपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन राजा ढाले यांनी केले. नीतिमान आयुष्य जगणे म्हणजेच बौद्ध धम्म आहे. बंडखोरी हा पिंड कार्यकर्त्यांचा असलाच पाहिजे. मात्र एकावेळी हिंदू आणि बौद्ध असे दोन धर्मात राहू नका असे राजा ढाले यावेळी म्हणाले.

सीमाताई आठवले या खूप सुसंस्कृत आहेत. त्यांच्या भेटीमुळे माझे रामदास आठवलेंबद्दलचे गैरसमज दूर झाले असे राजा ढाले यावेळी म्हणाले. रमाबाई आंबेडकर नगरात अद्ययावत दुमजली ग्रंथालय उभारावे अशी सूचना राजा ढाले यांनी यावेळी रामदास आठवलेंना केली. शिक्षणाने क्रांती झाली आहे आता प्रतिगामी शक्तींच्या 70 पिढ्यांनी प्रयत्न केले तरी आमच्यावर ते गुलामगिरी लादु शकत नाही असे राजा ढाले यावेळी म्हणाले.

बुद्धिझमवर आधारलेली आंबेडकरी चळवळ नक्षलवादाकडे जात कामा नये- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

दलित पँथर चे संस्थापक राजा ढाले यांचे विचारवंत नेते म्हणून त्आंबेडकरी चळवळीला मोठे योगदान लाभले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे तत्त्वज्ञान राजा ढाले यांनी आपल्या वक्तव्यातून; लिखाणातून;मांडले. ते खरे आंबेडकरी चळवळीचे अग्रणी भाष्यकार ठरले आहेत. त्यांचा सत्कार कोणताही स्वार्थ डोळयांसमोर ठेऊन केला नसून निस्वार्थपणे केला आहे.राजा ढाले यांचे आंबेडकरी चळवळी ला मोठे योगदान लाभले असल्यानेच हा सत्कार सोहळा आयोजित केला असल्याचे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले. आंबेडकरी चळवळ ही भगवान बुद्धांच्या अहिंसा तत्वावर आधारली असून हिंसक नक्षलवादाकडे आंबेडकरी चळवळीला जाऊ देऊ नका असे आवाहन करून आम्हाला मार्क्स नको बुद्ध हवा असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चौकीदाराच्या चोरीत आता सत्तेसाठी लाचार असलेली शिवसेना देखील भागीदार !

News Desk

मध्य प्रदेशात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान

News Desk

जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे पाच नगरसेवक येणार अडचणीत

News Desk