HW News Marathi
राजकारण

रामदेव बाबांनी साधुसंताना केले धूम्रपान न करण्याचे आवाहन

प्रयागराज | ‘ज्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही धूम्रपान केले नाही अशा राम आणि कृष्णाचे आपण भक्त आहात. मग धूम्रपान का करता ? तुम्ही धूम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे’, असे आवाहन योगगुरू बाबा रामदेव यांनी कुंभमेळ्यातील साधू-संतांना केले आहे. रामदेव बाबा प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी ते तेथील साधुसंतांशी संवाद साधत होते.

‘मी अनेक तरुणांचे धूम्रपानाचे व्यसन सोडवले आहे. मग तुमच्यासारख्या महात्म्यांना का सांगू शकत नाही ?’, असेही ते यावेळी म्हणाले. रामदेव बाबा यांनी यावेळी कुंभमेळ्यातील अनेक साधूंकडून चिलम गोळा करून आपण पुन्हा कधीही धूम्रपान करणार नसल्याची शपथ घेण्यास सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या भाषणादरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेत मोठा गदारोळ

News Desk

प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी ठरणार ?

News Desk

असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखी पाहिजे !

News Desk