HW News Marathi
राजकारण

RamMandir : असा असेल उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. ठाकरे कुटुंबीय आणि त्यांचे विशेष सचिव मिलिंद नार्वेकर विशेष विमानाने मुंबई विमानतळावरुन अयोध्येसाठी रवाना होत आहेत. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

ठाकरेंचा अयोध्या दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आज दुपारी ३ वाजता अयोध्येत दाखल होणार आहेत. रामचरित मानस आणि रामललांच्या मूर्तीसह ते अयोध्येत दाखल होतील. अयोध्येत उद्धव ठाकरे यांचा तेथील क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य या समाजांकडून त्याचप्रमाणे भोजपुरी सभा यांच्याकडून नागरी सत्कार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अयोध्येतील साधुसंतांकडून ‘लक्ष्मण किला’वर उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे. ‘लक्ष्मण किला’वरील हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता उद्धव ठाकरे शरयूच्या तटावर जाऊन आरती करतील.

उद्धव ठाकरे रविवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता अयोध्येत रामललांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच दुपारी १ च्या सुमारास ते अयोध्येतील जनतेशी हिंदी भाषेतून संवाद साधणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आलेले ‘ते’ ६ मंत्री नाराज ?

News Desk

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा विधानभवनावर धडकणार

News Desk

फैजाबादनंतर आता अहमदाबादचेही नामकरण ?

swarit