HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील कसबा मतदारसंघात ‘मविआ’कडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी

मुंबई | पुण्यातील कसबाच्या (Kasba Bypoll Election) आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होणार आहे. कसबा पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी भाजप आग्रही आहे. परंतु, महाविकास आघाडीने कसबा पोटनिवडणूक लढविण्याची तयारीत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस (Congress) ही जागा लढविणार आहे. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना कसबा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रविंद्र धंगेकर यांचे ट्वीट करत उमेदवारी दिल्याचे जाहीर केले आहे.

नाना पटोलेंनी ट्वीट करत म्हटले, “पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धव ठाकरे इलेव्हन’ दिवाळीपर्यंत तुरुंगात, किरीट सोमय्यांचा इशारा!

News Desk

नांदुरमध्यमेश्वर आरोग्य उपकेंद्रामुळे गावातच मिळणार उपचार; नागरिकांनी एकोप्याने गावाचा विकास साधावा! – छगन भुजबळ

Aprna

“चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय”, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला

News Desk