Site icon HW News Marathi

…आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही! – एकनाथ शिंदे

मुंबई। कायदाही जाणतो, त्यामुळे आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही, असा पलटवार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीट करत दिला आहे. गेल्या दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्ष पाहता शरद पवार यांनी काल (२३ जून) पत्रकार परिषद घेतली. “बंडखोर आमदारांनी इथे येऊन बोलले पाहिजे आसाममध्ये राहून नाही”,असे खडेबोलही शरद पवार यांनी सुनावले. यानंतर शिंदेनी ट्वीट प्रत्युत्तर दे म्हणाले, “१२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. ”

शिंदेनी ट्विटमध्ये म्हणाले, “कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.” “कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, ” असे ते म्हणाले. “12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोतआहोत, ” असे ते म्हणाले.

शरद पवार पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणाले

“शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निकाल पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत असेही शरद पवार यांनी सांगितले, ” असे शरद पवार म्हणाले.

Exit mobile version