HW News Marathi
राजकारण

मंत्री महादेव जानकर यांना दिलासा

मुंबई | देसाईगंज नगर परिषद निवडणुकीत निवडणूक अधिका-यांवर दबाव टाकल्याच्या आरोपातून मंत्री महादेव जानकरांची मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने सबळपुराव्या अभावी जानकर यांना दोषमुक्त केले आहे. डिसेंबर २०१६ रोजी देसाईगंज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होती. तत्पूर्वी ५ डिसेंबर २०१६ रोजी मंत्री महादेव जानकर देसाईगंज येथे आले होते. त्यांनी प्रभाग क्रमांक ९ ब मधील काँग्रेसचे उमेदवार जेसा मोटवानी यांच्या पक्षातर्फे सादर केलेले नामनिर्देशनपत्र मागे घेऊ द्यावे व त्यांना कपबशी हे निवडणूक चिन्ह द्यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांवर दबाव आणला. याबाबतची चित्रफीतही व्हायरल झाली होती. या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममाताजी, ‘जय श्रीराम’ची घोषणा पाकिस्तानमध्ये द्यायची का ?

News Desk

युती शिवाय तयारीला लागा | मुख्यमंत्री

News Desk

अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा

News Desk