HW News Marathi
राजकारण

रिपब्लिकन पक्षाला मिळणारे राज्यातील एक मंत्रिपद अविनाश महातेकर आणि भुपेश थुलकर यांना विभागून देणार

मुंबई | रिपब्लिकन पक्षाला राज्य सरकार मध्ये एक राज्यमंत्रीपद देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. पुढील निवडणुकांसाठी केवळ 13 महिन्यांचा काळ उरला आहे. त्यामुळे पक्षाला देण्यात येणाऱ्या राज्यमंत्री पदाचा त्वरीत शपथविधी घेण्यात यावा तसेच मिळणारे राज्यमंत्री पद रिपाइं चे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर आणि रिपाइं चे महाराष्ट्राचे अध्यक्ष भुपेश थुलकर यांना प्रत्येकी 6 महिन्यांसाठी विभागून देण्यात यावे अशी शिफारस आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली आहे.

राज्यात प्रलंबित असलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असून रिपब्लिकन पक्षाला मिळणाऱ्या महामंडळांच्या पदांमध्ये सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना नियुक्ती देऊन समतोल साधला जाईल अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. भाजप शिवसेना रिपाइं महायुती मध्ये रिपब्लिकन पक्षाला राज्य सरकार मध्ये 5 टक्के वाटा देण्याचे निश्चित झाले असून त्यानुसार राज्यात एक राज्यमंत्रीपद आणि दोन महामंडळाची अध्यक्षपदे तसेच महामंडळाची 40 सदस्यपदे देण्यात यावी याबाबत चा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना रिपाइं ने दिला आहे. त्याप्रमाणे महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद राजाभाऊ सरवदे यांना देण्यात आले असून एक राज्यमंत्रीपदासाठी अविनाश महातेकर आणि भुपेश थुलकर यांची नावे देण्यात आली आहेत.तसेच महामंडळाची मिळणारे सदस्यपदे ही सर्वजातीधर्माच्या कार्यकर्त्यांना वाटून समतोल साधण्यात येईल असे रामदास आठवले यांनी अधिकृत जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

महिलांनी एकीचा इतिहास घडवावा, राम कदमांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे कडाडले

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाची माहिती

Aprna