Site icon HW News Marathi

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी; तर ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते

मुंबई | मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly Bypoll) शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा 66 हजार 247 मतांनी विजयी झाला आहे. या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज (6 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी मतमोजणी सुरु झाल्यापासून ऋतुजा लटके या आघाडीवर होत्या. तसेच या पोटनिवडणुकीत दुसऱ्या नंबरवर नोटाला मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहे. नोटाला 12 हजार 776 मते मिळाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मतमोजणी सुरू झाल्यापासून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या आघाडीवर होत्या. तर या मतमोजणीत नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याची दिसून आले आहे. या पोटनिवडणुकीत नोटाला जास्त मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहेत. ठाकरे गटाकडून भाजपने मतदानापूर्वी नोटाला मतदान करण्याचे आव्हान विरोधकांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात शिंदे गट निवडणुकीच्या रंगणात उतरणाऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. परंतु, शिंदे गटाने युतीचा म्हणजे भाजप ही पोटनिवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले.  यानंतर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर राजकारण झाले. बीएमसीने ऋतुजा लटकेंनी राजीनामा दिला असून त्यांनी ऋतुजा लटकेंचा राजीनामा मान्य केला नाही. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यनंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मान्य झाला. यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत पाठिंब्याची मागणी केली. यानंतर राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून भाजपने उमेदवार मागे घ्यावा, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजपने आपला उमेदवार मागे घेण्याची मागणी केली. या सर्व राजकीय घटनामोडी घडल्यानंतर पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु, पटेलयांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपविरोधात घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

Exit mobile version