HW Marathi
देश / विदेश राजकारण

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

नवी दिल्ली | मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी अखेर रॉबर्ट वाड्रा यांनी आज (६ फेब्रुवारी) अंमलबजावणी संचालनाय (ईडी)च्या कार्यालयात हजर झाले आहे. रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई असून पूर्व उत्तर प्रदेशाच्या महासिचव प्रियांका गांधी यांचे पती आहेत. तसेच वाड्रा हे दुपारी चार वाजताच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात वकिलांसोबत दाखल झाले आहे. पहिल्यांदाच वाड्रा ईडीसमोर हजर झाले आहे.

वाड्रा यांना मनी लाँडरिंग प्रकरणी १६ फेब्रुवारीपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला आहे. न्यायालयाने ६ फेब्रुवारी रोजी रॉबर्ट वधेरा यांच्या चौकशीसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे आज (६ फेब्रुवारी) वाड्रा ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. वाड्रा यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रियांका गाधी पांढऱ्या रंगाच्या टोयोटा लँड क्रूझर गाडीतून कार्यालयात दाखल झाले आहे.

रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय सुनील अरोडांविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल केला आहे. सुनील अरोडा यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. हे प्रकरण लंडनस्थित १७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेचे आहे. ईडीने केलेल्या दाव्यानुसार ती मालमत्ता रॉबर्ट वाड्रा यांची आहे.

 

 

Related posts

राफेल प्रकरणात लपवण्यासारखे आता काहीच उरले नाही !

News Desk

बँक लुटण्यासाठी खोदला दोन हजार फूट लांबीचा बोगदा

News Desk

लायन एअरवेजचे विमान कोसळले

News Desk