HW News Marathi
राजकारण

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेडून मंजूर

मुंबई | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly By-Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा मुंबई महापालिकेने राजीनामा मंजूर केल्याचे पत्र दिले आहे.  ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी आज (14 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. यानंतर मुंबई महानगर पालिकेने ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर केला आहे. ऋतुजा लटके आज आपला उमेदवार अर्ज भरणार आहेत.

निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर ऋतुजा लटकेंनी एक महिन्यापूर्वीच दिला होता. तेव्हापासून ऋतुजा लटके नोकरीवर हजर नव्हत्या. तरी सुद्धा ऋतुजा लटकेंचा राजीनामा पालिकेने मंजूर केला नाही. तसेच ऋतुजा लटकेंच्याविरोधात 12 ऑक्टोबर 2020 मध्ये भ्रष्टाचाराची तक्रार आली होती. यामुळे पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नाही, असे न्यायालयात पालिकेच्या वतीने युक्तीवात करताना ज्येष्ठ वकील अनिल साखरे म्हणाले. परंतु, न्यायालयाने पालिकेला ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याने फटकारले.

 

न्यायालयाने पालिकेला फटकारले

उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान पालिकेला खडेबोल सुनावले आहे. या प्रकरणावर निर्णय देताना न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना म्हटले, “सर्व सामान्य कर्मचाऱ्याला राजीनाम्या एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवयाची आहे. तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हावा, हे प्रकरण येथेपर्यंत यायलाच नको होता”, असे म्हणत पालिकेचे कान टोचले. न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवताना म्हटले, “महापालिका आयुक्तांकडे विशेषाधिकार असला तरीही तो योग्य पद्धतीने वापरायचा असतो. अन्यथा तेही न्यायिक तपासणीच्या अधीन येते. या प्रकरणात मनमानी पद्धतीने राजीनामा पत्र स्वीकारण्यात दिरंगाई केल्याची दिसत आहे.” आणि न्यायालयाने पालिकेला राजीनामा स्वीकारला की नाही. यासंदर्भात 2.30 वाजता भूमिका मांडण्यास सांगितले होते. यानंतर न्यायालयाने निकाल दिला होता.

 

संबंधित बातम्या

ऋतुजा लटकेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! उमेदवारीचा मार्ग मोकळा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लक्ष्मीकांत खाबिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी

Gauri Tilekar

मंत्रालयाच्या सचिव दालनात बेस्टच्या संपावर बैठकीला सुरुवात

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तीनपैकी एका आरोपी डॉक्टरला अटक

News Desk