HW Marathi
क्रीडा राजकारण

सचिन तेंडुलकर-शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज (३० मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे. परंतु या दोघांच्या भेटी मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत पवार आणि तेंडुलकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

Related posts

अजितदादा जेव्हा सिंहासन नाकारतात तेव्हा.

Ramdas Pandewad

उदयनराजे यांच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, पैशाच्या पाकीटसह मोबाईल फोन लंपास

News Desk

#LokSabhaElections2019 : अखेर ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ची अधिकृत घोषणा

News Desk