HW News Marathi
राजकारण

मी बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

भोपाळ | भोपाळ येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करून नवीन वाद निर्माण केला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी शनिवारी (२० एप्रिल) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘निश्चित स्वरूपात राम मंदिर बांधण्यात येणार असून हे एक भव्य मंदिर असेल.’ यानंतर मंदिर उभारण्यासाठीच्या वेळमर्यादेबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रज्ञा यांनी सांगितले की, ‘आम्ही मंदिर बांधणार. कारण बाबरी मस्जिदचा ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हीच तेथे गेलो होतो’.

त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी बाबरी मस्जिदसंदर्भात आपल्या भूमिकेवर प्रकाश टाकत म्हटले की, ‘ मी बाबरी मशिदीवर चढून ती पाडण्यासही मदत केली होती. मी चढाई करून ढाचा तोडला. हे काम करण्यासाठी देवाने मला संधी दिली, याचा मला अभिमान आहे. मला शक्ती मिळाली आणि मी ते काम पूर्ण केले. आता त्याच जागेवर राम मंदिर उभारणार.’या विधानामुळे साध्वी प्रज्ञा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या विधानाची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी साध्वींना नोटीस बजावण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणारा आयएएस अधिकारी निलंबित

News Desk

बाळासाहेबांच्या मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे

swarit

प्रियांका गांधी दिल्लीत जीन्स-टॉप, तर राजकीय दौऱ्यावर साडी नेसतात

News Desk