HW News Marathi
राजकारण

‘मातोश्री’नंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संभाजी भिडे ‘वर्षा’वर

मुंबई | राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सध्या सुटण्याची शक्यता दिसत नाही. दरम्यान, सत्तास्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या भांडणात मात्र सरकार स्थापन होण्यास दिवसेंदिवस अधिकाधिक विलंब होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरूजी यांनी काल (७ नोव्हेंबर ) अचानक ‘मातोश्री’कडे धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर उपस्थित नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान ‘मातोश्री’नंतर आज (८ नोव्हेंबर) संभाजी भिंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगला गाठला आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

राज्यात सध्या महायुतीचे दोन मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांची प्रथम ‘मातोश्री’वर आणि त्यानंतर ‘वर्षा’ भेट अत्यंत लक्षवेधी ठरते. दरम्यान, संभाजी भिडे हे जरी ‘मातोश्री’वर गेले असले तरीही उद्धव ठाकरेंशी त्यांची भेट होऊ शकली नाही. संभाजी भिडे जवळपास २० मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही. मात्र, आता संभाजी भिंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटू शकलेला नाही. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरून निर्माण झालेला संघर्ष अद्याप थांबायचे नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील घडामोडींना देखील चांगलाच वेग आला आहे. उद्या (९ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपणार असून याच पार्श्वभूमीवर आज (८ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करणार !

News Desk

एआयएडीएमकेचे १८ आमदार अपात्रच, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

४ आमदारांसह राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच करणार काँग्रेसला रामराम ?

News Desk