HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

संभाजीराजेंची खासदार निधीतून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

कोल्हापूर | राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संभाजीराजेंनी त्यांच्या खासदार निधीतून ५ कोटींची मदत जाहीर केली आहे. संभाजीराजे यांनी यांची माहिती आज (१२ ऑगस्ट) दिली आहे.

संभाजीराजे यांनी ट्वीटर हँडलवरून ट्वीटकर यासंदर्भातील माहिती दिली आहे. संभाजीराजे यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “माझ्या निधीतून ५ कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझे संपूर्ण जीवनच समर्पित आहे.”

बचावकार्यामध्ये लक्ष घालून आहेत. त्यांनी काल मदतकार्याची माहिती देताना फेसबुकवरून सांगितले, की कोल्हापूर शहर व आंबेवाडी, प्रयाग चिखली या गावांतील पाणी ओसरत असले, तरी शिरोळ तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. विशाखापट्टणम येथून १३ बोटी मागवण्यात आल्या असून त्याही शिरोळला देणार आहे. तर राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे.

तसेच शिर्डीच्या साई संस्थानानेदेखील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. संस्थानने पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. तसेच डॉक्टरांची टीम औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी ट्विट करून दिली आहे.

 

Related posts

नव्याचे नऊच दिवस असतात, अजित पवारांचा टोला

News Desk

क्रिकेट सोबतच सर्व खेळामध्ये दलित खेळाडूंना आरक्षण द्या – रामदास आठवले यांची मागणी

News Desk

अंत्ययात्रेदरम्यान पूल कोसळून २५ जण नदीत कोसळले

News Desk