HW News Marathi
राजकारण

“संजय राठोड यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केलेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी”, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या पटप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आज झाला आहे. शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येक 9-9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यात शिंदे गटातून संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी देखील शपथ घेतली. परंतु, या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राठोडांना मंत्रीपद देणे हे दुर्दैवी आहे, अशी टीका व्हिडिओ ट्वीट करत केली आहे. राठोडांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ताबडतोप व्हिटीओ ट्वीटरवर त्यांच्यावर टीका केली आहे.

चित्र वाघ म्हणाल्या, “महाराष्ट्रातील आपली बंगिनी पुजा चव्हाण हीच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केलेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असता आहे. संजय राठोड मंत्री जरी झाला असेल तरी त्यांच्याविरुद्धचा माझा लढा…हा मी सुरुच ठेवणार आहे. न्याय देवतेवर माझा पूर्णविश्वास आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात ‘लढेंगे भी और जितेंगे भी’,” असे व्हिडीओतून राठोडांवर टीका केली.

 

नेमके काय आहे प्रकरण

बीड जिल्ह्यातील पुजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणींची आत्महत्या केली. पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्येला शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. ही तरुणी तिचा भाऊ आणि मित्रासोबत इंग्लिश स्पीकिंगच्या कोर्स करण्यासाठी पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीमध्ये राहत होते. ही तरुणी टिकटॉक या सोशल मीडिया अॅपवर सक्रिय होती. या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुजा चव्हाण हिचे बरेशे फॉलोवर होते. पुजा चव्हाण हीने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी सोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाले होते. या ऑडिओ क्लिपमध्ये पुजा चव्हाण, तिचा मित्र आणि मंत्र्यांचे संभाषण व्हायरल झाले होते. या प्रकरणात एक व्हिडीओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे यावरून राजकारण रंगले होते. या ऑडिओ क्लिपवरून पुजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या नेमके काय संबंध होते?, यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. परंतु, पुजा चव्हाणच्या कुटुंबियांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. पुजा सानंतने मानसिक ताणातून आत्महत्या केल्याचे सांगितले होते. त्याव्यतिरिक्त पुजा चव्हाणच्या कुटुंबियांनी आमची कोणाविरोधातही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर संजय राठोड यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

Aprna

यंदा काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका !

News Desk

विरोधकांना देशासोबत उभे राहण्यात संकोच वाटतो !

News Desk