HW News Marathi
राजकारण

विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या मागणीला राऊतसह कमलनाथ यांचा पाठिंबा

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या देण्यासाठी आज (११ फेब्रुवारी) तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी देखील चंद्राबाबूंना पाठिंबा दिला आहे.

 

विषेश राज्याच्या मागणीला दिग्गज नेत्यांचा पाठिंबा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सकाळी जावऊन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेवून त्यांना पाठिंबा दिला आहे. “मी आंध्र प्रदेशच्या लोकांसोबत उभा आहे. मोदी हे कोणत्या प्रकारचे पंतप्रधान आहेत ? आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेले आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे ते खोटे बोलतात. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. मोदींनी राफेल विमान खरेदीत घोटाळा केला. चौकीदार चोर है’,” असे बोलत राहुल यांनी मोदींवर आरोपाच्या फैऱ्या साडल्या आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील चंद्राबाबूची भेट घेऊन त्यांना पाठिंबादिला आहे. केजरीवाल यांनी चंद्राबाबूंची भेट घेऊन मंचावर उपस्थितांना संबोधित करताना त्यांची जीभ घसरली. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, ते फक्त भाजपचे पंतप्रधान नाही, तर ते देशातील जनतेचे पंतप्रधान आहे. ज्याप्रमाणे मोदी विरोधी राज्यांच्या सरकारबरोबर पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे वागतात,” असे वादग्रस्त विधान केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तमाम वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न !

News Desk

पुन्हा एकदा शहांच्या पश्चिम बंगालमधील सभेला परवानगी देण्यास ममतांचा नकार

News Desk

भाजप सरकारने तोट्यातल्या कंपनीसाठी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकू नये | संजय निरुपम

News Desk