HW News Marathi
राजकारण

आमचं घोडं कुठेही अडलेलं नाही, उलट उधळलंय !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता महिना होत आला आहे. मात्र, अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये आलेल्या वृत्तानुसार ३० डिसेंबर रोजी सोमवारी राज्याचा हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होईल. यावर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार इतका काळ लांबण्याचे नेमके कारण काय ? घोडे कुठे अडले होते ? असा प्रश्न विचारला असता “३० डिसेंबरला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार, हे निश्चित आहे. आमचं घोडं कुठेही अडलेलं नाही. उलट उधळलंय”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

“राजभवनावर येत्या सोमवारी म्हणजेच ३० डिसेंबरला दुपारी १२.३०-१ च्या सुमारास राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, हे नक्की झाले आहे. यात कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडं अडलेलं नाही. यासंदर्भात संपूर्ण चर्चा आणि वाटप पूर्ण झालेले आहे. खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांसह सरकारमध्ये सामील असलेल्या इतर प्रमुख दोन पक्षांच्या अध्यक्षांचा आहे. त्याप्रमाणे, या तिघांचीही चर्चा झालेली आहे. कुठेही आमचं घोडं अडलेलं नाही. आमचं घोडं उधळलेलंच आहे”, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे, शिवसैनिकांमध्ये नाराजी असण्याचे कारण नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच दोन नेते या राज्यांत परिवर्तन घडवू शकतात. त्यांच्यातच ती क्षमता आहे. माझे कायमच हे म्हणणे होते. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा परिवर्तन घडवले आणि आता शरद पवारांवर देखील तीच जबाबदारी आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रात सर्वांना एकत्र घेऊन हा बदल घडवून दाखवला आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची स्तुती देखील केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला सेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, राज्य उभारायचे आहे | उद्धव ठाकरे

Gauri Tilekar

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महविकासआघाडी सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna

स्थायी समितीच्या सभापती झाल्या दहावी पास  

News Desk