HW News Marathi
राजकारण

आता शाळेत हजेरी लावताना ‘जय हिंद’, ‘जय भारत’ म्हणा

अहमदाबाद | आपण लहानपणापासून विद्यार्थ्यी शाळेत हजेरी लावताना येस सर किंवा मॅडम म्हणण्याऐवजी आता ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ बोलावे लागणार आहे. देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिक्षण विभागाने निर्णय जारी करण्यात आला असून या संदर्भात काढण्यात आल्य अधिसूचनेमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. देशातील भावी पिढीवर देशभक्तीनेच संस्कार रुजावेत म्हणून हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (GSHSEB) यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की, इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ अथवा ‘जय भारत’ बोलून हजेरी लावावी लागणार आहे. सरकारी शाळा, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांना या अधिसूचनेचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. १ जानेवारी २०१९पासून या अधिसूचनेच पालन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.

मुला-मुलींमध्ये लहानपणापासूनच देशभक्ती रुजावी, या उद्देशाने संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात सोमवारी (३१ डिसेंबर) झालेल्या आढावा बैठकीत राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुदासमा यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही अधिसूचनेची प्रत पाठवण्यात आल्या आहेत, सोबत १ जानेवारीपासून या आदेशाचे पालन करण्यात यावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

 

Related posts

मोदी सरकारचा क्रांतिकारक निर्णय

News Desk

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटीची ऑफर | कुमारस्वामी 

News Desk

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुज वाजले; 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार

Aprna