HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

HW Exclusive: मी राजकीय षडयंत्राचा बळी | एकनाथ खडसे

शिवाजी मामणकर |  काहींनी आपल्याला राजकीय षडयंत्राचा बळी करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एच. डब्ल्यू न्यूज मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीला अवघा २ ते ३ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने मंत्रीपदासाठी मी स्व:त उत्सक नसल्याचे देखील खडसे एच.डब्ल्यू.शी बोलताना म्हणाले.

गेल्या वर्षी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तेव्हा माझ्यावर चौकशी सुरू असल्याचे कारण देण्यात आले. माझी चौकशी  पूर्ण झाल्यानंतर मंत्री देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. विरोधीपक्ष नेता असताना मी नेहमीच जे सत्य आहे ते मांडत आल्याचे खडसेंनी एच. डब्ल्यूला सांगितले.  “मी नेहमी अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध संघर्ष केला, कुणाचीही पर्वा न करता किंवा परिणामांची चिंता न करता सर्वांसमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न आहे”, असेही खडसे म्हणाले.

…तर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती संपूर्णपणे वेगळी असती !

“भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे जर आज राजकारणात असते तर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती संपूर्णपणे वेगळी असती”, असे देखील खडसे म्हणाले. २०१९ मध्ये राज्यात भाजप सरकार आल्यानंतर तर तुम्हाला मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळेल का ?, असा प्रश्न विचारला असता “पक्ष जो आदेश तो मला मान्य असेल. मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागणारा कार्यकर्ता आहे”, असे खडसे म्हणाले.

सरकारचे अपशय दाखवू नये असे कोणत्या पुस्तकात लिहले आहे ?

कुपोषणाचा मुद्दा सभागृहात मांडून सरकारला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रश्न विचारला असता एकनाथ खडसे म्हणाले कि, “ती माझी भूमिका नव्हती, ते सत्य होते. सरकारने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे मी तो सभागृहात मुद्दा मांडला. सरकारचे अपशय दाखवू नये असे कोणत्या पुस्तकात लिहले आहे ? सरकार एखाद्या ठिकाणी कमी पडत असेल किंवा अपयशी ठरत असेल तर सरकारला ते दाखवून देणे, गैर असल्याचे मला वाटत नाही.”

मी राजकीय षडयंत्राचा बळी !

तुमची पक्षातील लोकांना भिती वाटते म्हणून तुम्हीला सत्तेपासून दूर ठेवले जात आहे का?, या प्रश्नाला उत्तर देताना खडसे म्हणाले की, “भिती वाटण्याचा प्रश्न नाही, ज्याचे त्याचे कर्तृत्त्व असते. मला राजकीय षडयंत्रचा बळी करण्याचा प्रयत्न केला आहे.  महाराष्ट्राची जनता आता जाणते, कोणत्याही प्रकारचा गैर व्यवाहार आणि भ्रष्ट्रचार मी आजपर्यंत केल्याचा आरोप सुद्धा झाला नाही. अचानक आरोप करणे मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि त्वरीत राजीनामा मागणे आणि मंत्री मंडळाच्या बाहेर टाकणे हे एक षडयंत्राचा एक भाग असल्याचे माझे मत असल्याचे खडसेंनी एच. डब्ल्यूशी बोलताना सांगितले.

आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता जरा अधिकच !

सध्या भाजपमध्ये अनेक मंत्र्यांवर आरोप असून सरकार त्यांना पाठिंशी घालते, असा प्रश्न विचारल्यानतंर खडसेंनी सांगितले की, “तो सरकारचा प्रश्न आहे. अनेक वेळा अनेक मंत्र्यावर आरोप होतात. त्याची चौकशी देखील केली जात नाही. काही ठिकाणी गंभीर स्वरुपाचे आणि गुन्हे दाखल झाले.  फौजदारी गुन्हे दाखल झाले, तर काही ठिकाणी भ्रष्ट्राचाराचे पुरावे आढळले, परंतु सरकारने त्यांची दखल देखील घेतली गेली नाही. मी असताना फक्त आरोप झाला आणि राजीनामा द्या, येथून सुरुवात झाली, मला असे वाटते, की, आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता जरा अधिकचा दिसतोय, असा टोला खडसेंनी भाजपला लगावला आहे.

ज्यांचे अधिक अधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री !

महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण असेल, असा प्रश्न विचारल्यानंतर खडसेंनी उत्तर दिले की, महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हेच आमचे मत आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाजपची ताकद आज महाराष्ट्रभर आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपने निवडणुका लढविल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आम्हाला यश मिळाले आहे. ज्याचे अधिक अधिक आमदार येतील त्यांचा मुख्यमंत्री असतो, मग तो शिवसेनेचा असो वा भाजपचा असो, असे खडसेंनी एच.डब्ल्यूशी बोलताना सांगितले.

Related posts

मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार !

News Desk

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश

News Desk

महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

News Desk