Site icon HW News Marathi

दिग्विजय सिंह यांची काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; जाणून घ्या कारण…

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी सुद्धा काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून (Congress President Election) माघार घेतली आहे.  काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची आज (30 सप्टेंबर) शेवटची तारीख आहे.  येत्या १७ ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. तर १९ ऑक्टोबरला याचा निकाल जाहीर होणार आहे. दिग्विजय सिंह यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर म्हणाले, “निवडणूक लढण्याऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा देत असून त्यांच्या विरोधात लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आणि पुढेही पक्षासाठी काम करत राहणार आहे.”

 

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नावाची चर्चा होती. पण, अखेर गेहलोत यांनी दिल्लीत जाऊन काल (29 सप्टेंबर) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमधील राजकीय परिस्थिती पहाता, निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कुठले नेते असणार अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत?

काँग्रेसच्या दिग्गज नेते अशोक गेहलोत आणि दिग्विजय सिंह या दोन नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसचे G-२३ मधील नेते शशी थरूर आणि  राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे या दोन नेत्यांमध्ये थेट लढाई पाहायला मिळणार असून शशी तरूर या पढासाठी सुरुवातीपासूनच इच्छुक असल्याचा मानल जात होते. त्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी आज आपला अर्ज सुद्धा दाखल केला आहे.

मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला – अशोक गेहलोत

अशोक गेहलोत म्हणाले, “मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी ते मान्य केले नाही. यानंतर मी  म्हणालो की मी निवडणूक लढेन. पण, आता राजस्थानमधील राजकीय घडामोडी लक्षात घेता. मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.”

संबंधित बातम्या

“मी काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला”, अशोक गेहलोत यांची घोषणा
Exit mobile version