HW News Marathi
राजकारण

शंकरसिंग वाघेला राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?

नवी दिल्ली | गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले. मात्र, २०१७ साली ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा ते राष्ट्रवादीत जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे म्हटले जात आहे.

शंकरसिंग वाघेला यांनी गुजरातच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी एक नवीन स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. मात्र, त्यांना एकाही जागेवर यश मिळाले नाही. आता वाघेला आपले राजकारणातील स्थान टिकविण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास उत्सुक असल्याची माहिती मिळत आहे. जर शंकरसिंग वाघेला यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर गुजरातमध्ये राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा मोठा विजय

News Desk

संघ सोडल्यानंतर ख्रिश्चनांबाबत सुभाष वेलिंगकरांची मवाळ भूमिका

News Desk

वायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ ‘राहुल गांधी’ तर १ ‘गांधी’ निवडणुकीच्या रिंगणात

News Desk