HW News Marathi
राजकारण

शरद पवारांनी राज ठाकरेंना टूरिंग टॉकीजसाठीची पुढची स्क्रिप्ट दिली

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या टूरिंग टॉकीजसाठीची पुढची स्क्रिप्ट दिली असल्याचा टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे. शरद पवार उस्मानाबाद येथून परतत असताना त्यांनी सोलापूरात राज यांची भेट घेतली. आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलून शरद पवार यांनी राज यांच्याशी घेतलेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी हा टोला लगावला आहे.

“राज ठाकरे यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सध्या सुरु आहेत. नांदेडसह लवकरच आता महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत”, अशीही टिका विनोद तावडे यांनी याआधी केली होती. “राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वतः कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत. पण आपल्या जाहिर सभांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करीत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत”, असेही विनोद तावडे यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात निवडणुकीदरम्यान ‘या’ घटनांमळे निर्माण झाला तणाव

News Desk

ज्यांनी ५ वर्षे राज्याचं गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवच – हसन मुश्रीफ

swarit

#MarathaReservation : आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज होणार सुनावणी

News Desk