May 24, 2019
HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होत. राज्यातील दुष्काळामुळे तयार झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती.

‘सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’ अशी मागणी करणारे पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होत या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

लोकसभेचा रणसंग्राम संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पवारांनी थेट शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जात आणि चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणीही जाणून घेतल्या या समस्यावर आज मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार यांनी चर्चा केली. यावेळी शरद पवार यांच्यासोबत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, आ.राणाजगजीत सिंह पाटिल व राजेश टोपे आदी दुष्काळग्रस्त भागातील प्रतिनिधी उपस्थित होते.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…जालना मतदारसंघाबाबत

News Desk

आता डान्सबारमध्ये प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक ?

News Desk

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk