HW Marathi
देश / विदेश राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शरद पवार यांनी कलम ३७० संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी !

मुंबई | “कलम ३७० व कलम ३५ ए बाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण कलम ३७० जर तसेच ठेवले तर कश्मीर प्रश्न तसाच राहतो. परंतु, जर कलम ३७० काढले तर काश्मीर प्रश्न आपोआप सुटण्यास मदत होते. दहशतवादी पाकिस्तानलाही हे कलम ठेवले पाहिजे असे वाटत आहे. त्यामुळे यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे ?”, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (१० एप्रिल) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.

“देशभरातील विरोधक एकत्र नाहीत. परंतु, निवडणुकानंतर मात्र आपल्याला एकत्र येऊन भाजपशी लढावे लागेल, असे सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ भाजप सत्तेत येईल आणि आपण विरोधात बसू हे येचुरी यांना मान्य आहे. कदाचित शरद पवारांना हे आधीच माहित असल्याने ते निवडणूक लढले नाहीत”, असा टोलाही विनोद तावडे यांनी यावेळी लगावला आहे.

“निवडणुकांमध्ये पैसे हे काँग्रेसचे मुख्य हत्यार आहे. परंतु सध्या कॉंग्रेसचे पैसे अडकल्याने ते अस्वस्थ झाले असावेत. निवडणुकांच्या काळातील काँग्रेसच्या हालचालींची माहिती आयटीला मिळाल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली असेल. निवडणूक आयोगानेही यामध्ये सरकारचा हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर आय. टीमध्ये काही चुकीच नसेल तर मग घाबरण्याचे काही कारणच नाही”, असेही तावडे यांनी म्हटले आहे.

Related posts

रामदास कदम उद्धव ठाकरेंचा कुत्रा, नितेश राणेंची जहरी टीका

News Desk

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान

News Desk

चिन नागरीकावर हल्ला

News Desk