HW News Marathi
राजकारण

 शरद पवारांच्या सभेला अखेर परवानगी

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यात आयोजित केलेल्या हल्लबोल संर्घष यात्रेची शनिवारी सांगता होणार आहे. पण, मोर्चाला पोलिसांची परवानगी असली, तरी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्टेज उभारण्यास मंजुरी नसल्यामुळे औरंगाबाद महापालिकेने परवानगी न दिल्यामुळे राष्ट्रवादीची धावपळ सुरु होती. अखेर पोलिसांनी मध्य रात्री सभेला परवागनगी दिल्यामुळे सभेचा मार्ग मोकळा झाला.

सभेपूर्वी शनिवारी सकाळी ११ वाजता क्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतर आयुक्तांना निवेदन देऊन, दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत सभेद्वारे हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता होईल.

या सभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींना दिली निपाह व्हायरसची उपमा

News Desk

UP मध्ये मराठी भाषा शिकवा; भाजपच्या ‘या’ नेत्याने योगींना लिहिले पत्र

Aprna

शरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची !

News Desk